Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सायरन वाजल्यामुळे जळगावात चोरीचा प्रयत्न फसला !
    क्राईम

    सायरन वाजल्यामुळे जळगावात चोरीचा प्रयत्न फसला !

    editor deskBy editor deskDecember 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    चोरीच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सराफ कारागिराच्या घराचा कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र, दरवाजाला बसविलेले सायरन वाजल्यामुळे मालकासह परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि चोरटे दुचाकी सोडून पसार झाले. ही घटना शनिवारी पहाटे सराफ बाजारातील मारवाडी व्यायामशाळेजवळ घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मारवाडी व्यायामशाळेजवळ अनिल इंगळे यांचे पद्मावती गोल्ड सोने-चांदीचे दागिने घडविण्याचे दुकान असून काळ्या रंगाचे कपडे आणि डोक्यात टोपी घातलेले चार चोरटे त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराच्या बाहेरील बाजूला लावलेले लोखंडी अँगल कापले. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजाला लावलेले सायरन वाजल्याने मोठ्या आवाजामुळे घरात झोपलेले इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिकांना जाग आली. सायरनचा आवाज होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.

    दुकान फोडण्यापूर्वी चोरट्यांनी आर. वाय. पार्क परिसरातून दुचाकी चोरली होती. त्या दुचाकीवरून ते चोरी करण्यासाठी गेले. परंतु, सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी आणलेली दुचाकी तेथेच सोडून ते पसार झाले. पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अशोक खरात प्रकरणात नवे गूढ; एकाच तारखेला उघडली अनेक बँक खाती !

    April 5, 2026

    आकाशवाणी चौकात कुरीयर बॉक्स फोडला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; मोबाईल चोरीचा पर्दाफाश

    April 5, 2026

    अमळनेरात थरार : घरात घुसून महिलेचा विनयभंग; पतीवर बॅटने जीवघेणा हल्ला !

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.