नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षापासून शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर कारवाई सुरु असतांना आता काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या बहुचर्चित जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे.
नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. कायद्याने आमदारांना २ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होते. त्यानुसार, आता केदार यांना दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.