Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू
    क्राईम

    जळगावात विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 12, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील वाल्मीक नगरात राहणाऱ्या विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

    याबाबत माहिती अशी की, अश्विनी रोहित सपकाळे (वय 22) रा.वाल्मिक नगर, जळगाव ह्या पती रोहित कैलास सपकाळे यांच्यासह सासू, सासरे, दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. आज रविवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पती रोहित आणि सासू हे दोघे नातेवाईकांना भेटण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्यावेळी विवाहिता घरी एकट्याच होत्या. त्यांनी पाणी तापवण्यासाठी हिटर लावले होते. त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला, त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान विवाहितेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करुन एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ : वाढदिवसाला न बोलविल्याने संपविले आयुष्य !

    April 9, 2026

    धक्कादायक! शाळेबाहेरील गैरकृत्यांमुळे ‘त्या’ शिक्षकावर गाजले निलंबन !

    April 9, 2026

    पाहुणी बनून घरात शिरली, विश्वासघात करून दागिने लंपास; ९७ हजारांची चोरी !

    April 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.