Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३० वर्षीय तरुण रात्रपाळीसाठी कामाला गेला अन घडल ते धक्कादायक !
    क्राईम

    ३० वर्षीय तरुण रात्रपाळीसाठी कामाला गेला अन घडल ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskDecember 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील ३० वर्षीय तरुण रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असतांना कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसीत उघडकीस आली. या घटनेत गणेश वसंत सोनार (वय ३०) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसीतील जे सेक्टरमध्ये मिनाक्षी गोल्ड नावाची चटई कंपनी आहे. या कंपनीमध्ये गणेश वसंत सोनार हा तरुण कामाला होता. रविवारी रात्रपाळी असल्याने रात्रीच्या सुमारास गणेश हा कामावर गेला होता. कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात रात्रीच्या सुमारास गणेश हा बुडाला. रविवारी सकाळच्या सुमारास दुसऱ्या शिफ्टमधील कर्मचारी ड्युटीवर आल्यानंतर त्यांना हौदात गणेश हा बुडालेला दिसून आला. त्यांनी लागलीच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    पोलिसांनी कंपनीतील इतर कामगारांच्या मदतीने गणेशचा मृतदेह हौदातून बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांची एकच आक्रोश केला. घटना सीसीटीव्हीत कैद कंपनीत काम करणारा गणेश हा रात्रीच्या सुमारास हौदात बुडतांनाची घटना कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये गणेशला फिट आल्यामुळे तो हौदात बुडतांनाची दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.