नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दाऊद इब्राहिम हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे, एनआयएने गेल्या वर्षी बक्षीस रकमेची यादी जाहीर केली होती. यामध्ये दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले असून सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल आहे. त्याला विष देण्यात आल्याचा संशय प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तो २ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. त्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दाऊदला ज्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे, त्या हॉस्पिटलमध्ये दुसरा कोणताही रुग्ण नाही. फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्य तिथे जाऊ शकतात. मुंबई पोलिसही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. दाऊदच्या मुंबईतील नातेवाईकांकडून माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संयुक्त राष्ट्रानेही दाऊदला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 2003 मध्ये दाऊद इब्राहिमवर 25 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. त्याच्यावर विविध राष्ट्रीय संस्थांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आणि शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणासह अनेक गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी 1970 मध्ये सिंडिकेट डी-कंपनीची स्थापना केली.