Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वर्षाच्या अखेरीस सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण !
    जळगाव

    वर्षाच्या अखेरीस सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण !

    editor deskBy editor deskDecember 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    वर्षाच्या सरत्या महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्यापासून विचार करता, सोन्यात जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीने पण माघार घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. दिवाळीपासून दोन्ही धातूच्या किंमती सूसाट होत्या. सोन्याने 65 हजारांच्या टप्पा ओलांडला तर चांदी 78 हजारांच्या घरात पोहचली होती. लग्नसराईत भाव एकदम वाढल्याने चिंता वाढली होती. भाव कमी झाल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे.

    या आठवड्यात सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. गेल्या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती प्रत्येकी 220 रुपयांनी घसरल्या. बुधवारी 13 डिसेंबर रोजी किंमती 100 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

    या आठवड्यात चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास 3500 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात 11 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली. 13 डिसेंबर रोजी भाव 700 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    March 20, 2026

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.