अमळनेर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर संगनमताने अत्याचार केल्याप्रकरणी न्यायधिश पी. आर. चौधरी यांनी दोघा आरोपींना प्रत्येकी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (रा. मिल्लत नगर चोपडा) आणि शेख मुजक्कीर हमीद पिंजारी (रा. मण्यारअळी चोपडा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 157/2019 भा. द. वि. कलम 363, 366, 34, पोस्को कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या सुमारे पंधरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत आरोपी गुलाम रसुल शेख मस्तान मोमीन याने प्रेमसंबंध निर्माण केले होते. अल्पवयीन पिडीत मुलगी शाळेत जात असतांना 6 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास दोघे आरोपी तिला चोपडा शहरातून अमळनेर येथे फिरायला घेऊन गेले. त्यानंतर दोघांनी तिच्यासोबत संगनमताने कुकर्म केले.
या गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहायक फौजदार सुनिल पाटील केला. या गुन्ह्याचा सर्वांगिन तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी पुर्ण केला. त्यांना हे.कॉ. प्रदिप राजपूत यांचे सहकार्य लाभले. सहायक सरकारी अभियोक्ता आर. बी. चौधरी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. केस वाच पो.कॉ. नितीन कापडणे यांनी याकामी मदत केली.