लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : वरणगाव महामार्गावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांमधून डिझेल चोरी करणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून गाडी ,डिझेल व डिझेल चोरी करण्याचे साहित्य असे 4 लाख 79 हजाराचा 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महामार्गावर असलेल्या हॉटेल्स व ढाब्यांवर उभे राहणाऱ्या गाड्यांमधून गेल्या वर्षभरापासून डिझेल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती अशाच डीजल चोरी करणार्या टोळीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याना मिळाली होती . मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउनि अमोल देवढे,सफै अशोक महाजन युनूस शेख सुनील दामोदरे जयंत चौधरी दीपक पाटील महेश महाजन नंदलाल पाटील प्रमोद लाडवंजारी किरण धनगर भागवत पाटील रवींद्र पाटील राहुल बैसाणे सचिन महाजन अशोक पाटील मुरलीधर बारी या टीमला मुक्ताईनगर ते भुसावळ दरम्यान एम एच 04 डिके 7170 वाहन शोधण्याचे सांगितले वरणगाव जवळील खुशल ढाब्याजवळ सदरची गाडी उभी असलेली दिसून आली व त्याठिकाणी दोन संशयित संशयित रीत्या फिरताना दिसून आले सदर टीमने आरोपी रईस हाशिम शेख वय 36 राहणार भिवंडी ,रुआब अली जलील अहमद वय 32 राहणार युपी ,चालक अनिल सुभाष सरोदे वय 32 राहणार भिवंडी यांना ताब्यात घेतले असता
त्यांच्याकडून (39010) 39 हजार दहा रुपयाचे 415 लिटर डिझेल , चाळीस हजार रुपये चे डिझेल चोरी चे साहित्य चार लाखाच्या ट्रक असा एकूण चार लाख 79 हजार दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.