जळगाव : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील रस्ते जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तयार केले जाणार आहे. यात जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते जोडणी अंतर्गत हा निधी मिळाला आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही दळणवळणासाठी फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांसाठी ११ कोटी तर सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणारे प्रमुख जिल्हामार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता ३४ कोटी निधीचा समावेश करण्यात आला आहे. यात
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कामांमध्ये धरणगाव तालुक्यातील, आहिरे गावालगत अंजनी नदीवर पुलाचे ७ कोटीतून बांधकाम. वाघळूद बु. गावाजवळ ३ कोटी ९६ लाख निधीतून पुलाचे बांधकाम, नारणे ते नांदेड रस्ता रुंदीकरण, सह सुधारणा करण्यासाठी ३ कोटी,चावलखेडा ते भोद फाटा ३ कोटी, जळगाव तालुक्यातील फुपनगरी ते ममुराबाद, गिरणा पंपिग रस्ता, विटनेर ते वराड रस्त्याचे जलनिस्सारणासह मजबुतीकरण, जवखेडा ते वडली आणि पाथरी ते म्हसावद मजबुतीकरण, आसोदा ते देऊळवाडे रस्त्या, जिल्हा परिषदेतंर्गत होणारी कामांमध्ये धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६ रस्त्यांच्या व मोयऱ्या बांधकामासाठी ११ कोटी मंजूर झाले आहे. वाघळूद बु, ते बोरखेडा रस्ता, नांदेड ते झुरखेडा रस्ता, चांदसर ते निभोरा डांबरीकरण, एकलग्न ते बोरखेडा डांबरीकरण,
वराड ते पोखरी रस्ता, चांदसर ते कवठळ रस्ता, शेरी ते पथराड बुद्रुक रस्ता आहे.
ग्रामीण भागातील चांगले पूल व रस्ते हे फक्त्त दळण-वळणासाठी नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी या महत्वाचा उद्देश आहे. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून आरोग्य, शिक्षण व रोजगार गावात पोहोचेल. – गुलाबराव पाटील, पालकमंत्री