Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी चोरत्याला एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    दुचाकी चोरत्याला एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskDecember 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील मेहरूण तलाव परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या एका चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या इतर ३ अशा एकूण ४ दुचाकी हस्तगत केले आहे. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनी परिसरातील सिद्धार्थ लुल्ला यांची दुचाकी २५ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनच्या दिवशी तलाव परिसरातून चोरी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये संशयित आरोपी हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.

    त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सुप्रीम कॉलनीमध्ये सापळा रचून संशयित आरोपी प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याला अटक केली. त्याच्या जवळील चोरीची दुचाकी हस्तगत केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने इतर चोरीच्या ४ दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी चारही दुचाकी ताब्यात घेऊन संशयित आरोपीच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले, असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, छगन तायडे आणि ललित नारखेडे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.