Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाताचा मृत्यू !
    क्राईम

    सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाताचा मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील कोळगाव येथील भूषण दिलीप महाजन (३२) या दौंड (पुणे) येथे एसआरपीएफमध्ये असलेल्या व गावी सुटीवर आलेल्या जवानाचा शनिवारी रात्री दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या सुपुत्रास मिरवणूक काढत शेवटचा निरोप दिला.

    मिळालेल्या माहितीनुसार, भूषण महाजन (पाटील) हे लहान भावाला मुलगी झाल्याने बारशाच्या कार्यक्रमासाठी गावी काही दिवसांच्या सुटीवर आले होते. ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री ८ ते ९ च्या सुमारास गावानजीक दुचाकीने येत असताना अपघात झाला. त्यांना प्रथम चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात तेथून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

    शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव गावी आणत कोळगाव-पारोळा मार्गावरील एका शेतात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. भूषण महाजन व त्यांचे दोन बंधू सैन्यदल, कारागृह पोलिस सेवेत आहेत. महाजन यांना लहान मुलगा व मुलगी आहे. आई वडील व पत्नी असा परिवार आहे. जवानाच्या मृत्यूनंतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. तरुणांनी गावातून सजवलेल्या ट्रॅक्टरवरुन मिरवणूक काढली. गावात, चौकात रांगोळी काढण्यात आल्या होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आधी मुलगा बुडाला… वाचवायला गेलेले वडीलही बुडाले! अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

    August 27, 2026

    पोलिसांचा ‘एमपीडीए’चा धडाका ; चाळीसगावच्या वाजिद खानची नागपूर कारागृहात रवानगी !

    August 27, 2026

    अल्पवयीन मुलीचा पाठलाग, ; आरोपीला न्यायालयाचा दणका, ६ महिने सश्रम कारावास!

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.