• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

५०० मीटर दरीत कोसळली जीप : ७ जणांचा मृत्यू

editor desk by editor desk
November 17, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
५०० मीटर दरीत कोसळली जीप : ७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक राज्यात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच उत्तराखंडमधून एक भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. नैनीताल जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ १७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते तसेच चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातात झालेल्या गाडीत किती लोक होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी पुढे पाठवले जात आहे. बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये तीन महिला, एक बालक आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. येथील रस्ता खराब असल्याने वाहन नियंत्रण सुटून खोल खड्ड्यात पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. सध्या घटनास्थळी लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांचा दौरा आटोपताचा तरुणाचा खून !

Next Post

थरारक : अल्पवयीन मुलाने गाडी पळवून ४-५ वाहनांना उडविले !

Next Post
थरारक : अल्पवयीन मुलाने गाडी पळवून ४-५ वाहनांना उडविले !

थरारक : अल्पवयीन मुलाने गाडी पळवून ४-५ वाहनांना उडविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाकिस्तानच्या कुरपती वाढल्या : जवानाला आले वीरमरण !
क्राईम

पाकिस्तानच्या कुरपती वाढल्या : जवानाला आले वीरमरण !

May 11, 2025
वऱ्हाडाच्या वाहनाला पहूरनजीक अपघात : एक ठार, अकरा जखमी !
क्राईम

वऱ्हाडाच्या वाहनाला पहूरनजीक अपघात : एक ठार, अकरा जखमी !

May 11, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जळगावात कर्ज घेऊन वित्त संस्थेला ३२ लाखांचा चुना !

May 11, 2025
धरणगावनजीक भीषण अपघात : पिता ठार, मुलगी जखमी !
क्राईम

धरणगावनजीक भीषण अपघात : पिता ठार, मुलगी जखमी !

May 11, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

वृद्धाला जीवे मारण्याची धमकी देत लुटले !

May 11, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

कोणत्याही आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्या.

May 11, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group