• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाच लाखांची लाच घेणे पडले महागात : जळगावात एसीबीची कारवाई !

editor desk by editor desk
November 14, 2023
in क्राईम, जळगाव
0
पाच लाखांची लाच घेणे पडले महागात : जळगावात एसीबीची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात दिवाळी सणाचा सर्वत्र उत्साह सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगाव एसीबीने कारवाईचे फटाके फोडत जळगावातील सहाय्यक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍याला पाच लाखांची लाच घेताना अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी पाडव्याची शासकीय सुटी असताना लाचखोर महाभाग पंचायत समिती कार्यालयात आले व लाच स्वीकारताच एसीबीने काम फत्ते केले. विस्तार अधिकारी तथा सध्या पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (54) व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (53) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील 38 वर्षीय तक्रारदार हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये आरोपी तथा प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे हे चौकशी पथकातील प्रमुख आहेत. तुम्हाला चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील, अशी मागणी 7 नोव्हेंबर रोजी दोघा लाचखोरांनी केली व लाच रक्कम देण्याचे निश्चित झाल्यानंतर लाचखोरांनी दिवाळी पाडव्याचा शासकीय सुटीचा दिवस लाच स्वीकारण्यासाठी निवडला. एरव्ही सर्वत्र शासकीय सुटी असताना अधिकारी दिवाळीचा आनंद मनवत असताना लाचखोरांनी मात्र पंचायत समितीचे दालन उघडले व तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच तक्रारदाराने इशारा करताच एसीबीने लाचखोरांच्या मुसक्या बांधल्या. लाचखोरांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाणे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Previous Post

मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते व पुलांच्या विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर : ना. गुलाबराव पाटील

Next Post

अज्ञातांनी केला ३० वर्षीय तरुणाचा खून !

Next Post
अज्ञातांनी केला ३० वर्षीय तरुणाचा खून !

अज्ञातांनी केला ३० वर्षीय तरुणाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group