जळगाव : प्रतिनिधी
शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्यांच्या पिशवीतून साडेचार हजारांची रोकड लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. सणानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने चोरटे देखील सक्रीय झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी परिसरात सुवर्णसिंग भरतसिंग राजपूत (वय ५१) हे वास्तव्यास आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी राजपूत हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील फुले मार्केट परिसरात गेले होते. त्यांनी सोबतच्या कापडी पिशवीत रोख रक्कम ठेवली होती. मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी राजपूत यांनी कापडी पिशवीत ठेवलेली साडेचार हजारांची रोकड काढून घेतली. काही वेळानंतर हा प्रकार राजपूत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण करीत आहेत.