धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संजय पवार म्हणले की, आगामी होणाऱ्या निवडणुका संदर्भात धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क साधून त्या तातडीने सोडाव्यात असे देखील त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील उभी फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार यांचा गट तयार झाला आहे. आगामी काळात पक्ष संघटना नगरपालिका, जिल्हा परिषद गट , पंचायत समिती गण गावापातडीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेतृत्व सांभाळणारे राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या नेतृत्वात गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन महिन्याच्या सुमारास धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी संजय पवार म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या गटातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे तसेच काही अडचणी असल्यास सर्वांनी माझ्याशी संपर्क साधावा, आलेल्या अडचणी त्याचवेळी सोडण्यात येईल, असे आश्वासन देखील संजय पवार यांनी दिली आहे. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन, माजी अध्यक्ष रमेश पाटील, प्रकाश ओंकार महाजन, सुरेखा माळी यांनी देखील मार्गदर्शन केले.
यावेळी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला महिला राष्ट्रवादी माजी अध्यक्ष शोभा पाटील, कल्पना पाटील, भुपेन्द्र पाटील, भवरखेडा माजी सरपंच शामकांत पाटील, आनंदा पाटील, किशोर पाटील, विजय पाटील , दिनकर पाटील, निंबा पाटील, एकनाथ पाटील, बोरगाव विकासोचे चेअरमन माधव पाटील, चांगो भिल्ल , रवि महाजन, ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, विजय माळी, जगदीश जगताप, राजेंद्र पाटील, कैलास सांळुखे, वाय.डी. पाटील, कपिल पाटील, निलेश भदाणे, गणेश पाटील, बापु सोनवणे, दिपक पाटील, पंढरीनाथ बोरसे सर कल्याणे होळी, अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील कवठळ, प्रदिप पाटील, रमण पवार, मुकेश पाटील, भानुदास मराठे, नाटु परदेशी, फकीरा पाटील, कडु मराठे, निलेश मराठे, सागर माळी यांच्यासह अजित पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिटिंग यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाटेश्वर पवार यांनी मेहनत घेतली
यांच्या सह आदि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.