जळगाव : प्रतिनिधी
राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची रू. १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देवून निधी वितरित केला होता यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा आपल्या सर्वसामान्यांच्या सरकारचा निर्धार आहे.
परंतु विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान भरपाई जमा होण्यास थोडा विलंब होताच पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तीव्र शब्दात ठणकावले तसेच राज्याच्या कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्यासाठी सरसकट लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सदर नुकसान भरपाई रक्कम ही ४ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे असे आश्वासन पालकमंत्री यांना कंपनी द्वारे देण्यात आले आहे. यामुळे खरोखरच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्धारच जणू पालकमंत्री यांनी केला आहे.