जळगाव : प्रतिनिधी
मालकाच्या घरी साफसफाई करण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाच्या पायाला वीज तारेला स्पर्श झाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.१ नोव्हेबर रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बोहरा गल्लीत बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहीण यांच्यासोबत सुनील संजय चव्हाण (१६) हा वास्तव्यास असून तेथील फटाके दुकान मालकाने त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनील चव्हाण आणि त्याचा मित्र सागर शिंदे यांना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते. घराची साफसाफाई करत असताना विजेच्या तारेवर पाय पडल्याने याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी गणेश कॉलनीत घडली. दोघे जण घराची सफाई करता असताना सुनीलच्या पायाचा वीज तारेला स्पर्श झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीया अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.