जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सिद्धिविनायक कॉलनी परिसरात पती नोकरीवर तर मुले क्लासला गेलेली असताना सीमा शशिकांत कासोट (वय ३३) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले क्लासमधून घरी आली, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शशिकांत कासोट हे कामावर गेले होते. तर त्यांची मुले क्लासला गेलेली होती. त्यामुळे सीमा घरी एकट्याच होत्या. त्यावेळी त्यांनी घरात ओढणीने गळफास घेतला. सायंकाळी मुले क्लासमधून घरी आली तर घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारील मंडळींना सांगितले. त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडला असता मुलांसह शेजारील मंडळींना सीमा या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस पोहचले व विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांनी मयत घोषित केले. तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.