• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : अतिक्रमणधारकांनी डॉक्टरांचे वाहन फोडून केली जबर मारहाण

एकावर कोयत्याने वार, संशयितांमध्ये महिला पोलिसाचा समावेश ?

editor desk by editor desk
October 30, 2023
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : अतिक्रमणधारकांनी डॉक्टरांचे वाहन फोडून केली जबर मारहाण

जळगाव  : प्रतिनिधी

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास आलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर रविवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रुग्णालयाबाहेरील अतिक्रमणधारकांनी विनाकारण प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात डॉक्टरांच्या सहकाऱ्याला हाताला कोयता लागल्याने तो जखमी झाला असून उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन संशयितांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि महिला पोलीस असल्याची बतावणी करीत होती. दरम्यान, घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.

डॉ. नीरज चौधरी (वय ३३, रा. प्रताप नगर, जळगाव) असे फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे प्रताप नगरात रुग्णालय आहे. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील निलकमल हॉस्पीटल येथे रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी रविवारी २९ रोजी सकाळी ९. ३० वाजता सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह गेले होते. तिथे डॉ. चौधरी यांनी (एमएच १९ सीएफ ५६२८) या चारचाकीने पोहोचले. तेथे डॉ. चौधरी वाहन पार्क करीत असताना एक वयं अंदाजे २५ वर्ष वयाचा इसम हात गाडीवर नारळ विक्री करणारा धावत आला. त्याने सांगीतले की, तुम्ही ज्या जागेवर गाडी पार्क केली आहे, त्या जागेवर मी नारळाची गाडी लावतो, तुम्ही गाडी काढून घ्या असे म्हणाला. तेव्हा डॉक्टरांनी, दुसरीकडे वाहन लावायला जागा नाही. हि सार्वजनिक जागा आहे, असे सांगून दवाखान्यात निघून गेले.

त्यानंतर १५ मिनिटांनी हॉस्पीटलचा कामगार निलेश पावरा याने डॉ. नीरज चौधरी यांना सांगितले की, नारळाचे हातगाडीवाला इसम तुमच्या वाहनाची तोडफोड करत आहे. तुम्ही खाली या असे सांगितल्याने ते बाहेर आले. तेव्हा नारळविक्रेता व त्याच्या सोबत असलेला एक इसम वय अंदाजे २५ वर्षे असे दोघे अचानक डॉ. चौधरी यांचे अंगावर धावून आले आणि दमदाटी करू लागले. तेव्हा डॉक्टरांचे सहकारी अजय सेनानी व मंगेश दांगोडे यांनी मध्ये पडून सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यांना देखील मारहाण केली. एका इसमाने नारळाच्या हात गाडीवरील कोयता आणुन मंगेश दांगोडे याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे हातातील कोयता मंगेश दांगोडे याचे उजव्या हाताच्या अंगठ्या जवळील तळव्याच्या भागाला लागून तो जखमी झाला.

त्यानंतर त्या ठिकाणी एक महीला शिवीगाळ करत डॉक्टरांकडे येवून म्हणाली की, तु माझ्या आईला नारळाची गाडी का लावू देत नाही असे म्हणुन तिने डॉ. चौधरी यांना हाताबुक्यांनी मारहाण करून मी पोलीस आहे, तुला काय करायचे ते कर असे म्हणाली. त्यानंतर त्या ठिकाणी एमआयडीसी पोलीस दाखल झाले. सदर संशयितांची नावे अर्जुन राठोड, सोनु चव्हाण व एक महिला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

Previous Post

पारोळा : दुचाकी व कारचा अपघातात एक ठार !

Next Post

धक्कादायक! दोन पॅसेंजर मध्ये जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू

Next Post
धक्कादायक! दोन पॅसेंजर मध्ये जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू

धक्कादायक! दोन पॅसेंजर मध्ये जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group