लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालक्यातील बोरणार म्हसावद गटात रुग्णांना ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रेरणेने जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष बापूसाहेब परदेशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष वावडदा सरपंच राजेश वाडेकर यांनी रुग्णवाहिका बुक केली आहे.
बोरणार म्हसावद गटातील रुग्णांना जळगाव येथे आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असे त्यामुळे या गटामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या प्रेरणेने लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.
आज जळगाव येथे जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बोरणार म्हसावद गटातील गोरगरीब रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष बापूसाहेब परदेशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष वावडदा सरपंच राजेश वाडेकर यांनीमहिंद्रा शोरूममध्ये रुग्णवाहिका बुक केली आहे . लवकरच आपल्या बोरणार म्हसावद गटातील लोकांसाठी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवेचा लाभ होणार आहे या रुग्णवाहिका बुक करतांना महेंद्रा शोरूमचे प्रतिनिधी संतोष ठाकूर तसेच आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर , आयुष्य रुग्णालयात आरोग्य सेवा बजावत असलेले डॉ.नितिन पाटील व बिलखेडा येथील चैत्राम पाटील हे मान्यवर उपस्थित होते.