पराठा हा प्रत्येकालाच आवडतो. म्हणजेच आलू पराठा, चीझ पराठा, पनीर पराठा, यासारखे पराठा बनवले जातात. पण तुम्हाला जर पराठ्यामध्ये वेगळं काहीतरी हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर पराठा घरी करू शकतात. कोथिंबीर पराठा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
कोथिंबीर, गव्हाचे पीठ, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, पुदिन्याची पाने, आलं लसूण, ओवा, जिरे, तेल.
कृती
सर्वप्रथम कोथिंबीर धुवून बारीक चिरुन घ्यावी त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर गव्हाच्या पीठात टाकावी. त्यात हळद, धनेपूड, मसाला, मीठ टाकावे. त्यात पुदिन्याची पाने आणि कढीपत्ता टाकावा. आणि त्यात थोडा ओवा टाकावा. हिरवे मिरचे, आलं लसूण आणि जिरे बारीक करुन त्यात टाकावे.
सर्व मिश्रण एकत्र करावे. त्यात पाणी टाकून पीठ चांगल्याने मळून घ्यावं पीठाचा गोळा करुन दहा मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंतर या पीठाचे लहान गोळे करुन पराठे लाटावेत गरम तव्यावर तेल किंवा तूप टाकून पराठा दोन्ही बाजून चांगला भाजून घ्यावा.