धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हिगोणे या गावात १३ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि.२२ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास तिच्या राहत्या घरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी लागलीच धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास पोहेकॉ.खुशाल पाटील हे करीत आहेत.