Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किरण बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हरकतसाठी ३१ पर्यंत मुदत !
    क्राईम

    किरण बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हरकतसाठी ३१ पर्यंत मुदत !

    editor deskBy editor deskOctober 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी खंडपीठात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलेला असताना बाले यांनी सत्र न्यायालयात पुन्हा अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला. त्यावर हरकत दाखल करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून २५ ऑक्टोबर रोजी महिलांच्यावतीने वकीलपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. बकाले यांनी सत्र न्यायालय जळगाव व खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो नामंजूर झाला. बकाले यांनी गुन्ह्यातील फिर्याद रद्द करण्यासाठी खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यात बकाले यांनी तपासी अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन त्यांना सहकार्य करावे, असे आदेश खंडपीठाने दिले होते.

    बकाले जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तपासकामी हजर झाले नाही तर अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी पुन्हा सत्र न्यायालयात २१ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल केला. महिलांसंदर्भात अश्लील संभाषण असलेला हा गुन्हा असल्याने महिलांच्यावतीने हरकत दाखल करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून २५ ऑक्टोबर रोजी अॅड. गोपाळ जळमकर, ॲड. कुणाल पवार यांनी वकीलपत्र दाखल केले. त्या वेळी सर्वबाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर सत्र न्यायाधीश बी.एस. वावरे यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकत दाखल करण्यासाठी मुदत दिली आहे. सत्र न्यायालयात दाखल अटकपूर्व अर्जावर ३१ ऑक्टोबर रोजी युक्तीवाद होणार आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वैशाली महाजन यांनी म्हणणे मांडले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हिवाळ्यातही राहा फ्रेश आणि ग्लोइंग : परफेक्ट पार्टी लुकसाठी खास टिप्स

    December 8, 2025

    अंजली दमानिया सुपारीवर काम करतात; मास्टरमाइंडचा शोध घ्या !

    December 8, 2025

    विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाला शिंदे गटाचा विरोध !

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.