Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रस्त्याचा वाद अन तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या
    क्राईम

    रस्त्याचा वाद अन तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या

    editor deskBy editor deskOctober 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक राज्यात शेतीच्या वादातून असो वा रस्त्याच्या वादातून असो छोटे मोठे भांडण सुरु असतांना पण सध्या राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बयाना गावात रस्त्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा ट्रॅक्टरने चिरडून हत्या करण्यात आली. आरोपीने ट्रॅक्टरचे चाक तरुणाच्या अंगावर 8 वेळा घातले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.

    सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले की, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर गटामध्ये रस्त्याच्या संदर्भात बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. हाणामारीत दोन्ही बाजूंच्या महिलांचाही सहभाग होता. लढत असताना 35 वर्षीय निरपत गुर्जर जमिनीवर पडला. तेव्हा एका तरुणाने निरपतवर ट्रॅक्टर चालवला. थांबवूनही आरोपी ट्रॅक्टर चालकाने न थांबता जमिनीवर पडलेल्या निरपतवर ट्रॅक्टरचे चाक 8 वेळा चालवले. जखमी निरपतचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बयाना सीएचसी येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारामारीदरम्यान गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. आरोपी ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवली जात आहे.

    murder Rajsthan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : केवायसीची अखेरची तारीख जाहीर !

    October 29, 2025

    साईभक्तांच्या फॉर्च्युनरचा भीषण अपघात : तीन ठार, चार गंभीर जखमी

    October 29, 2025

    आता माघार नाहीच : बच्चू कडूंनी सरकारला दिला अल्टिमेटम !

    October 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.