पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातीलपिंपळी जगताप येथे धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पांतर्गत गायरान गट क्रमांक 60 येते गरुड झेप अकॅडमी यांच्या हस्ते अडीच हजार जणांचा टप्पा पूर्ण करण्यात आला.
श्री धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील गायरान गट क्रमांक ६० येथे लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात येत आहे . वृक्षारोपणाचा अडीच हजार झाडांचा टप्पा आज महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले स्पर्धा परिक्षा केंद्र गरूड झेप अकॅडमी यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आला. वनराई मध्ये ४० प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्री धर्मराज बोत्रे व विशाल बेंडभर यांनी दिली.
गरुड झेप अकॅडमीचे पिंपळे जगताप मधील चारशे विद्यार्थ्यांनी वनराई मध्ये श्रमदान केले. आज नवीन वृक्ष लागवडीबरोबरच झाडांना आळी करणे, खत देणे, पाणी देणे, आळ्यातील तण काढणे अशा विविध प्रकारची कामे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केली.
पर्यावरणाचे व श्रमदानाचे महत्त्व या विषयी ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे यांनी मार्गदर्शन केले.त्याच बरोबर गरूड झेप अकॅडमी चे शाखा प्रमुख .तुषार फेंगसे सर व अकॅडमी अडमिन .संकेत दांडगे सर व तसेच अकॅडमी चे स्पोर्ट्स टिचर,.रमेश सर,किशोर सर,मासुळे सर, उपस्थित होते व तसेच सूर्यकांत टाकळकर सर यांनी आभार मानले.