पारोळा : प्रतिनिधी
पती व पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पत्नी सासरी निघून आली होती तर पती मित्रासोबत मुलाला भेटण्यासाठी सासऱ्याच्या घरी आला असता याठिकाणी जावयावर मामेसासऱ्यासह शालकाने मारहाण करीत कुऱ्हाडीसारख्या वस्तूने वार केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील एका गावात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील व त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने आहे. त्यांची पत्नी मुलासह कुसुंबा येथे माहेरी निघून आली आहे. शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी रात्री योगेश पाटील हे मित्रासोबत मुलाला भेटण्यासाठी कुसुंबा येथे आले होते. पती-पत्नीतील वादामुळे योगेश पाटील यांचे सासरे विकास नथ्थू चोपडे यांनी पाठीमागून योगेश पाटील यांच्या डोक्यात कुन्हाडी सारख्या वस्तूने वार केला.