मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मल्याळम टीव्ही दिग्दर्शक आदित्यन यांचे निधन झाले आहे. आदित्यनचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले आणि यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, 19 ऑक्टोबर ला सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तत्काळ तिरुवअनंतपुरम येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आदित्यन यांचं अंतिम दर्शन भारत भवन, तिरुअनंतपुरम येथे ठेवण्यात येईल, त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील.
मल्याळम मधील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ‘संथावनम’ चं दिग्दर्शन त्यांनी केलं. या शोमधून त्यांना इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळाली. इंडस्ट्रीतील सर्वानी शोक व्यक्त करत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली आहे.