जळगाव : प्रतीनिधी
जळगाव एमआयडीसी हद्दीतील गुन्हेगारी तिघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकुर (19, डीएन.सी.कॉलेजजवळ, शंकर अप्पानगर, जळगाव), टोळी सदस्य निशांत प्रताप चौधरी (19, डीएन.सी.कॉलेजजवळ, शंकर अप्पानगर, जळगाव) व कुणाल उर्फ दुंड्या किरण कोळी (19, साईसिटी, कुसूंबा) अशी हद्दपार झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील गुन्हेगारांच्या तीघाकडून टोळीने गुन्हे केले जात होते शिवाय आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात दाखल होते. संशयितांना हद्दपार करण्याबाबत जळगाव एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, एएसआय अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, निलोफर सैय्यद आदींनी प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता.
हद्दपार प्रस्तावाचे कामकाज गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजनपाटील, अंमलदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनील पंडीत दामोदरे यांनी पाहिल्यानंतर प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आल्यानंतर अधीक्षकांनी आरोपींच्या हद्दपारीचे आदेश काढले.