Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » टोळक्याची दादागिरी थेट पोलिसाला केली मारहाण !
    क्राईम

    टोळक्याची दादागिरी थेट पोलिसाला केली मारहाण !

    editor deskBy editor deskOctober 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबई शहरातील अनेक परिसरात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. नुकतेच सायन परिसरातून एक धक्कादाक व्हिडीओ समोर आला असून टोळक्यातील काही तरूण ड्युटीवरील पोलिसालाल मारहाण करत असल्याचे त्यात दिसत आहे. त्यामुळे आता कायद्याचे रक्षकही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

    बुधवारी (18 ऑक्टोबर) X वर (पूर्वीचे ट्विटर ) एक व्हिडीओ समोर आला होता. एक पोलीस अधिकारी कथिपणे काही विद्यार्थ्यांशी भांडण करत असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. मात्र आता त्याच पार्अशवभूमीवर एक नवा व्हिडीओ बाहेर आला आहे, त्यात उपद्रवी तरुणांचा एक गट ड्युटीवर असलेल्या एका पोलिसाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

    तसेच त्याला उद्देशून गैरशब्द वापरत टोमणेही मारत असल्याचे व्हिडीओतून समोर आले. काही तरूणांनी तर त्या पोलिसाला शिवीगाळही केली. हा संपूर्ण प्रकार काही लोकांनी कॅमेऱ्यात कैद केला. तर इतर काहींनी त्या तरूणांना रोखत मारहाण न करण्याचा सल्ला दिला. मात्र त्या तरूणांनी रस्त्यावरील त्या इसमांनाही उद्धटपणे उत्तर दिले. त्या तरूणांनी धक्कादायकपणे कृती करत ड्युटीवर असलेल्या, वर्दी घातलेल्या त्या पोलिसाला अक्षरश: बेदम चोप दिला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर बराच गदारोळ माजला आहे. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.