Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांची मोठी कारवाई : तब्बल ६ कोटींचे ड्रग्ज जप्त !
    क्राईम

    पोलिसांची मोठी कारवाई : तब्बल ६ कोटींचे ड्रग्ज जप्त !

    editor deskBy editor deskOctober 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर : वृत्तसंस्था

    राज्यात ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला नुकतीच अटक झाली असल्याची घटना ताजी असतांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी मंगळवारी‎रात्री कारवाई करत ६ कोटींचे ड्रग्ज (अंमली‎पदार्थ) विक्रीसाठी नेताना पकडले. दोनच ‎दिवसानंतर ही मोठी कारवाई करून ड्रग‎ पकडल्यामुळे सोलापूर, पुणे, मुंबई असे ड्रग ‎कनेक्शन आहे काय या दृष्टीने पोलिसांनी‎तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी‎ आजच पुण्यातील ड्रग तस्कराला जेरबंद‎ करून मुंबईत आणले आहे. देवडी येथील‎कारवाईत अटक केलेल्या दत्तात्रय लक्ष्मण‎घोडके, गणेश उत्तम घोडके (अौंढी, ता.‎मोहोळ) या दोघांना माेहाेळ न्यायालयाने‎पोलिस काेठडी सुनावली.‎

    मुंबई, पुणे, सोलापूर शहरात सध्या ड्रग्जच्या‎(अंमली पदार्थ) मोठया कारवाया सुरु आहेत.‎दोन दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी‎चिंचोली एमआयडीसी परिसरातील बंद‎कारखान्यातून ड्रगचा (ड्रगसाठी लागणारा‎कच्चा माल) साठी पकडला होता. मंगळवारी‎पुन्हा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोहोळ देवडी‎फाट्याजवळ कारवाई केली आहे. चारचाकी‎वाहनातून दोघेजण सहा कोटीचे ड्रग ( अंदाजे‎तीन ते चार किलो) विक्रीसाठी घेऊन जाणार‎असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांना ‎मिळाली होती.

    त्यानुसार काही पथके‎कारवाईसाठी मंगळवारपासून तयार केले होते.‎रात्रीच देवडी फाट्याजवळ सापळा रचून‎दोघांना वाहनातून जाताना पकडले आहे.‎ बुधवारी सकाळी दोघा संशयित आरोपींना‎मोहोळ न्यायालयात हजर केल्यानंतर २३‎आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली‎आहे. दत्तात्रय लक्ष्मण घोडके, गणेश उत्तम‎घोडके (अौंढी, मोहोळ) या दोघांना अटक‎झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष‎सरदेशपांडे यांनी दिली. दरम्यान, राज्यात‎असलेल्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी सध्या‎पोलिस करत असल्याचे पोलिस दलातील‎सूत्रांनी सांगितले.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026

    सलमान खानचा आर्मी लूक व्हायरल; ‘मातृभूमी’ गाण्याने पेटवली देशभक्तीची भावना

    January 24, 2026

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.