Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी चोरीतील संशयित आरोपी दोन महिन्यानंतर ताब्यात !
    क्राईम

    दुचाकी चोरीतील संशयित आरोपी दोन महिन्यानंतर ताब्यात !

    editor deskBy editor deskOctober 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दुचाकी चोरीतील संशयित आकाश संजय नागपुरे ( वय १९) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जळके पाटील गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ राहणारे किरण हिलाल चिमणकारे यांच्या मालकीची दुचाकी दि. २४ जून रोजी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी शिरसोली येथील आकाश नागपुरे याने चोरल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांचे पथक तयार करीत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास आकाशच्या गावातूनच मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मास्टर कॉलनीत भीषण दुर्घटना; बाप–लेकीचा विजेच्या धक्क्यात मृत्यू, भाची गंभीर

    December 5, 2025

    ओव्हरटेकचा अट्टहास ठरला घातक; एसटी बस दोन तुकड्यांत, तीन ठार !

    December 5, 2025

    सोनीनगरात मध्यरात्री धाड : दोन घरांत चोरी; १ लाख ६३ हजारांचा ऐवज गायब

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.