जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एका २४ वर्षीय तरुण देवीची स्थापना होत असतांना झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ईश्वर निवृत्ती लोहार या तरुणाला शिवीगाळ त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे रविवार रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात ईश्र्वर निवृत्ती लोहार हा तरुण वास्तव्यास आहे. गावातील बेलदारवाडी येथे देवी बसविण्यासाठी गेले असता तेथे दोन जणांमध्ये भांडण सुरु होते. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी ईश्र्वर लोहार गेले असता भांडणाऱ्या दोघांपैकी एकाने शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर वार केला. त्यात ते जखमी झाले. या प्रकरणी जखमीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोमवारी रोजी वार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अनिस शेख करीत आहे.