• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गावठी पिस्तुल घेवून करत होता बसने प्रवास !

editor desk by editor desk
October 17, 2023
in क्राईम, चोपडा
0
गावठी पिस्तुल घेवून करत होता बसने प्रवास !

चोपडा : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून गावठी पिस्तुलांसह अनेक गुन्हेगार दहशत माजवीत असतांना पोलीस त्यांना बेड्या ठोकत आहे. तर नुकतेच गावठी पिस्तुलांसह बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाला चोपडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३ पिस्तुले हस्तगत करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उमर्टीकडून चोपडाकडे येणाऱ्या बसमधून एक संशयित युवक हा गावठी पिस्तुले घेऊन प्रवास करत असल्याची माहिती पोलिस ठाण्याला प्राप्त झाली. त्यावरून शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी तत्काळ सहा. पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, पोउनि घनश्याम तांबे, पोहेकॉ विलेश सोनवणे, संतोष पारधी, शेषराव तोरे पोना संदीप भोई, पोकों मिलिंद सपकाळे, रवींद्र पाटील, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, आत्माराम अहिरे यांच्या पथकाला रवाना केले व सापळा रचला.

चुंचाळे गावाजवळ उमर्टीकडून चोपडाकडे येणारी बस थांबवून संशयित युवकाची ओळख पटवून त्याच्याजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १ लाख ३० हजार रु. किमतीची गावठी बनावटीची ३ पिस्तुले २ हजार रु. किमतीचे १ खाली मॅगझीन व १० हजार रुपये कि.ची १० जिवंत काडतुसे तसेच रोख ३ हजार ३०० रु. व ५ हजार रु. किमतीचा १ मोबाइल असा एकूण १ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल आढळला. संशयिताचे नाव हनुमान गेनाराम चौधरी (२१, लोहावत, जि. जोधपूर, राजस्थान) असे असून त्याने हे पिस्तुल व राउंड हे उमर्टी, मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीकडून सत्रासेन येथे ताब्यात घेतल्याचे सांगितले. आरोपीविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावळे आणि शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.

Previous Post

६२ वर्षीय बेपत्ता शेतकऱ्याचा संशयास्पद आढळला मृतदेह !

Next Post

भांडण सोडविण्यासाठी गेला अन पोटावर शस्त्राने झाला वार !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भांडण सोडविण्यासाठी गेला अन पोटावर शस्त्राने झाला वार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group