Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलगा व मुलगी तलावात बुडून मृत्यू !
    क्राईम

    अल्पवयीन मुलगा व मुलगी तलावात बुडून मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    भिवंडी तालुक्यातील धामणगाव एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या एका बालकाचा आणि मुलीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडल्याची माहिती पाेलीसांनी दिली. या घटनेत वसीम मलिक (वय 7 राहणार. फातिमा नगर) व अंजुम फत्ते मो.रफिक (वय 12 राहणार. धामणगाव धापशी पाडा) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

    घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती नुसार भिवंडी शहरातील फातिमा नगर येथील आठ वर्षांचा वसीम हा तालुक्यातील वडपा धामण गाव धापशीपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी वसीम आपली नातेवाईक असलेली बारा वर्षांची मुलगी अंजुम व इतर दोन साथीदारांसह वडपा धामणगाव येथे तलावात पोहोचण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी बाजूला उभ्या असलेल्या दोन साथीदारांनी आरडाओरड केल्याने तेथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने मुलांचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्याने पाण्यातून मुलांना बाहेर काढत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. या घटनेत वसीम मलिक (वय 7 राहणार. फातिमा नगर) व अंजुम फत्ते मो.रफिक (वय 12 राहणार. धामणगाव धापशी पाडा) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.