Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात इंदिरा गांधी विद्यालयात संविधान दिन साजरा !
    धरणगाव

    धरणगावात इंदिरा गांधी विद्यालयात संविधान दिन साजरा !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 27, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील – धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘ माझे संविधान,माझा अभिमान ‘ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एस.पाटील हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे तर प्रमुख वक्ते प्रा.भरत शिरसाठ व पी.डी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बळवंत पाटील,जी.पी.चौधरी हे होते.

    यावेळी विद्यायात रांगोळी,निबंध लेखन,वकृत्व व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते पी. डी.पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव करीत भारतीय संविधानाच्या ३९५ कलम व गुरू शिष्य परंपरा यांची ओळख उपस्थितांना करुन दिली तसेच दुसरे वक्ते प्रा.भरत शिरसाठ यांनी भारताचे संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल उपस्थितांना माहिती दिली तसेच आरक्षण या बद्दल युवकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन एस.बी.पाटील यांनी केले.पाहुण्यांचा परिचय एस.एम.देशमुख यांनी केला. संविधानाचे वाचन बी.बी.पवार यांनी तर आभार एस.ए.शिरसाठ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विज्ञान विभागाचे डी.बी.बोरसे,ए.एस.सुर्यवंशी,पी.पी.पाटील,के.एन.पाटील,पी.डी.पवार,ए.एम. गावीत,पी. एल. झुंझारराव व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीच्या झवर विद्यालयात पोषण आहार घोटाळ्याचा संशय? मुदतबाह्य साहित्य आढळल्याने खळबळ

    June 20, 2026

    माणुसकीचा वाढदिवस! यश मंत्री आणि अमोल कासट यांची समाजासाठी लाखोंची देणगी

    June 14, 2026

    धरणगाव तालुक्यात उष्माघाताचा कहर; ७२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.