• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरावर दगडफेक अन परिवाराला केली मारहाण

जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 15, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी 

घरामागे राहणाऱ्या कुटुंबियांनी काहीही कारण नसतांना दुसऱ्या घरावर दगडफेक करीत त्या कुटुंबातील तीन जणांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील गजानन नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कानळदा रोड परिसरातील गजानन नगरात अशोक किसन ठोसर (वय – ५७) दोन मुलांसह वास्तव्यास असून ते फुटवेअरचे दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता अशोक ठोसर हे जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर पाणी पिण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या मागे राहणारे अजय इंगळे, विजय इंगळे, रूपाली इंगळे आणि सरूबाई इंगळे हे काहीही कारण नसतांना अशोक ठोसर यांच्या घरासमोर येवून मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ करू लागले. त्यानंतर चौघांनी अशोक ठोसर यांच्यासह मुलगा किरण आणि मुलगी आश्विनी यांना मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.

या मध्ये किरण याला लाकडी दांडाने मारहाण केली तर अश्वीनीच्या डोक्यात कुंडी मारून फेकली. तर काही अनोळखी १० ते १२ जणांनी त्यांच्या घरावर दगडफेक करून सामानांचे नुकसान केले. याप्रकरणी अशोक ठोसर यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजय इंगळे, विजय इंगळे, रूपाली इंगळे आणि सरूबाई इंगळे सर्व रा. गजानन नगर, कानळदा रोड, जळगाव आणि यांच्यासह अनोळखी १० ते १२ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

साकरी फाट्याजवळ आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Next Post

महामार्गावर भीषण अपघात : २३ प्रवासी जखमी तर १२ ठार

Next Post
महामार्गावर भीषण अपघात : २३ प्रवासी जखमी तर १२ ठार

महामार्गावर भीषण अपघात : २३ प्रवासी जखमी तर १२ ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group