जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील आर.एल.ज्वेलर्सचे शोरूम असलेल्या चौथ्या मजल्यावरील एका कॅबीनला दि.१४ रोजी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत आगीत त्याठिकाणावरील फाईल्स व कॉम्युटर खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रथ चौकात आर. एल. ज्वेलर्सचे शोरुम आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शो-रुममधील चौथ्या मजल्यावर असलेल्या अकाऊंट विभागाजवळील एका रुममधील कॉम्प्युटर ठेवलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्कीट होवून अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण करीत त्याठिकाणी ठेवलेल्या महत्वाच्या फाईल्स व कॉम्युटर आगीच्या विळख्यात घेतले.यामध्ये ते जळून खाक झाले. या आगीची माहिती जळून मिळतच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग अग्निशमन विभागातील वाहन चालक देविदास सुरवाडे, भगवान पाटील, सरदार पाटील, गिरीश खडके, तेजस जोशी यांच्या पथकाने विझवली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.