लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे बोदवड नगरपंचायत साठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत सर्वांचे लक्ष शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या विवर रचनेकडे राहील हे दोघेही एकत्र येऊन लढणार की आमने-सामने येणार हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत पहिल्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता यानंतर खडसे भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी नगरसेवकांना शिवसेनेत आणले होते त्यानंतर दुसरी निवडणूक होत असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम बोदवड नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे यात अंतिम प्रभाग निहाय याद्या अधिप्रमाणित 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात याव्यात.
जिल्हाधिकाऱ्याने निवडणूक कार्यक्रम 30 नोव्हेंबर रोजी जाहीर करावा नामनिर्देशन पत्र व राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी -1 डिसेंबर 2021 सकाळी 11 वाजेपासून ते 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 वाजेपर्यंत नाम निदर्शन पत्र स्विकारण्याची कालावधी –1 डिसेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 11 ते 3 वाजे दरम्यान राहील तसेच 4 डिसेंबर 5 डिसेंबर या दिवशी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत.
नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधता रित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात करण्याची दिनांक 8 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत
वैध नामनिर्देशनपत्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यास तारखेपासून तीन दिवसाच्या आत हरकती घेण्यात येतील 16 12 -2021 पर्यंत
तर 21 डिसेंबर 2019 रोजी 7.30 ते 5.30 वाजता दरम्यान मतदान