प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: तालुक्यातील मौजे वंजारी बुद्रुक येथे आत्मा अंतर्गत स्थापित ‘खानदेशी शेतकरी बचत गट’ अंतर्गत योगेश काकडे व रामकृष्ण चौधरी यांनी ऍडव्हान्टा कंपनीची कुमकुम वाणाची लाल भेंडी लागवड केली.
जिल्ह्यात प्रचार होणेसाठी उत्पादित झालेली भेंडी अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगांव यांना देते प्रसंगी उपस्थित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव ठाकुर साहेब, उपसंचालक अनिल भोकरे, आत्मा उपसंचालक मधुकर चौधरी, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, आत्मा बी टी एम दीपक नागपुरे, बिटीएम सोनू पाटील आणि ऍडव्हांटा कंपनी प्रतिनिधी प्रकाश पवार उपस्थित होते. सदरील लाल भेंडी ही आरोग्यवर्धक आहे या भेंडीच्या सेवनामुळे शुगर, बिपी, लठ्ठपणा नियंत्रित राहतो. ही भेंडी शरीरासाठी मेडिसीनल मूल्यवर्धक आहे. सदरील भेंडी कृषि विभागाच्या विकेल ते पिकेल अभियानांतर्गत लोकल बाजारपेठेत ८० – ९० रुपये किलो विक्री करत होत आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव संभाजी ठाकुर यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरयांनी या लालभेंडीची लागवड करुन चांगले उत्पन्न घेऊन हात विक्री करुन जास्त नफा मिळवावा असे आव्हान केले आहे.