लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातून घटनांमधून तीन मोबाईल चोरणारे चोरणाऱ्या चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी जळगाव मधून मुसक्या आवडल्या आहे त्यांच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे
शहरातील नितेश प्रशांत बरहाटे 21 रोजी आईबरोबर मोबाइलला टफन ग्लास लावण्यास गणेश कॉलोनी येथे गेले असता दोन अज्ञात इसमाने वय 20 ते 25 वर्ष यांनी फिर्यादीचा ओप्पो कंपनीचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून मोटर सायकलवर पळून गेले होते त्यानंतर त्यांनीच कु गायत्री अमरलाल अडवाणी रा सिंधी कॉलोनी यांचा सिंधी कॉलोनी येथून मोबाइल हिसकावून पळून गेले होते त्यानंतर अनुप पवार रा गणेश कॉलोनी यांचा रिंगरोड जळगाव येथून 2 चोरटे त्यांचा मोबाइल हिसकावून पळून गेले होते.
तिन्ही फिर्यादी च्या जिल्हापेठ पो स्टे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, एपीआय महेंद्र वाघमारे,पीएसआय प्रदीप चांदेलकर,हे कॉ महेंद्र पाटील , हे कॉ फिरोज तडवी,पो ना संतोष सोनवणे पो ना सलीम तडवी पो ना गणेश पाटील पो कॉ योगेश साबळे,पो कॉ समाधान पाटील,पो कॉ अमित मराठे,पो कॉ विकास पहुरकर यांनी तांत्रिक व गोपनीय बातमीदाराचे खात्रीशीर माहितीवरून आरोपि नामे 1)आकाश संजय पाटील वय 18 वर्ष रा वरणगाव जिजाऊ नगर ह मु कलेक्टर ऑफिस मागे जळगाव यास वरणगाव येथें तसेच दुसरा आरोपी 2)गणेश राजेंद्र शिंदे वय 18 वर्ष रा वाघनगर जळगाव असे दोघांनाही ताब्यात घेतले असता प्रथम फिर्यादीचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला असून नमूद दोन्ही आरोपींना न्यायाधीश मुगळीकर साहेबांसमक्ष हजर केले असता 25 पर्यंत पीसीआर रिमांड मिळाला असून पीसीआर कालावधीत आरोपितांनी गुन्ह्याची कबुली दिले वरून गुन्ह्यात वापरलेली मीटर सायकल व इतर दोन हिसकावून नेलेले मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे,