Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीला औषध देत दोघांनी केला अत्याचार !
    क्राईम

    अल्पवयीन मुलीला औषध देत दोघांनी केला अत्याचार !

    editor deskBy editor deskSeptember 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    राज्यातील तरुणीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क १५ वर्षीय मुलीला पेयातून गुंगीचे औषध देत दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुलुंडमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत रविवारी रात्री उशिराने गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड परिसरात १५ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी निलेश पुवज हरीजन (२१) याला अटक केली आहे. तर अन्य साथीदार नटराजन हरीजन (३७) याचा शोध सुरू आहे. तो सध्या तमिळनाडू येथे असल्याची माहिती समोर येत आहे.

    मुलीने निलेशकडे पैशांची मागणी केली. त्याने मुलीला घरात घेतले. यावेळी मित्र नटराजनही घरात होता. निलेशने पैसे दिले नाही. मुलीला पेयातून गुंगीचे औषध दिले. तिला जबरदस्तीने दारुही पाजली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास आईला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, चार ते पाच दिवसांच्या अंतराने निलेश याच्या घरी नेउन निलेश व नटराज यांनी धमकाहून तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. अखेर, अत्याचार वाढल्याने मुलीने रात्री उशिराने मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी पोक्सो, लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

    Crime maharashtra police Rap
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.