धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील निशाने ग्रामपंचायत शिवसेनेचा भगवा फडकला असून सरपंचपदी सौ मंगला रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्यासोबत गावाचा विकास करण्यासाठी आम्ही गेलो त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आज मंगलाताई पाटील त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,भाजप जिल्हा सोशल मीडिया प्रमुख टोनी महाजन,ग्रामपंचायत सदस्य उपजिल्हा प्रमुख शेतकरी सेना शरद भाऊ पाटील,शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील,तालुका संघटक हेमंत भाऊ चौधरी,रवींद्र चव्हाण,आर एस पाटील,केतन पाटील,रवींद्र कंखरे, दोणगावचे उपसरपंच पाटील,एकनाथ महाजन, सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गणपती उत्सवानंतर विविध विकास कामांचे उद्घाटन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.



