Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साळवा शिवारात गावठी हातभट्टी उध्दवस्त; धरणगाव पोलीसात एकावर गुन्हा दाखल
    क्राईम

    साळवा शिवारात गावठी हातभट्टी उध्दवस्त; धरणगाव पोलीसात एकावर गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 20, 2021Updated:November 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव लक्ष्मण पाटील। तालुक्यातील साळवा येथील शिवारात गावठी हातभट्टील उध्दवस्त करून सुमारे ४५ हजार रूपये किंमतीचे रसायन नष्ट केले आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना शनिवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मिळाली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथकांने दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास साळवा शिवारात धडक कारवाई करत सुरू असलेली गावठी हातभट्टी उध्दवस्त केली. या कारवाईत सुमारे ४५ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन नष्ट करण्यात आले. संशयित आरोपी सुरेश चंद्रसिंग भिल रा. साळवा ता. धरणगाव जि.जळगाव हा पोलीसांना पाहून फरार झाला आहे. ही कारवाई गोपनिय शाखेचे मिलींद सोनार, विनोद संदानशिव, समाधान भागवत यांनी केली. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.