लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: केंद्र सरकाने तयार केलेले तीन कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हे कायदे मागे घेत असल्याची जाहीर केल्याने लोकसंघर्ष मोर्चातर्फे फटाके फोडून व पेढे वाटून या स्वागत करत जल्लोष केला. हे कायदे रद्द करावेत; या मागणीसाठी देशात आंदेालन सूरू आहे.
केंद्र शासनाकडून तीन कृषी शेतकरी कायदे लागू केले होते. मात्र याला शेतकरींसह विरोधी पक्षातील नेत्यांचा विरोध होता.हे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या वर्षा भरापासून शेतकरींचे आंदोलन करीत आहे. अनेकांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठींबा दिला होता. तीन कृषी कायदे अन्यायकारक असल्याने ते रद्द करावेत या मागणीसाठी झालेल्या आंदोलनता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला होते. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे रद्द केले. याचे स्वागत लोकसंघर्ष मोर्चातर्फे केले. टॉवर चौकात लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, फारूख कादरी, पियूष पाटील आदी उपस्थित होते.
श्री.धांडे म्हणाले, की केंद्र सरकारेन तयार केलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हे काळे रद्द करण्यासाठी लोकशाहीत तब्बल एक वर्ष सत्याग्रह करावा लागला . काळे कायदे मागे घेण्यासाठीच्या आंदोलना शेतकऱ्यांनी हूतात्म प्रत्करले आहे. त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास लाखाची नूकसान भरपाई मिळाली पाहिजे.