मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) ;- मुक्ताईनगर येथे शासकीय विश्रामगृह येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रमुख पाहुणे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव आकाश धनगर ,कुणाल कोल्हे, कोमल पाटील, जिल्हा समन्वयक योगेश कोळी ,निर्मल भालेराव ,भावेश रोहिमारे, नयन पाटील हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक अ.फ.भालेराव हे होते. यावेळी युवा परिषदेच्या तालुका पदाधिकाऱ्यांना प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील , जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव कोमल पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच साहित्यिक अ. फ. भालेराव यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष निलेश मेढे यांनी केले त्यानंतर मुक्ताईनगर नवनिर्वाचित तालुका कार्यकारणीचा व जिल्हा समन्वयक निर्मल भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. निवड केलेली तालुका कार्यकारिणी खालील प्रमाणे:- निलेश मेढे तालुका अध्यक्ष, कृष्णा पाटील तालुका उपाध्यक्ष, सोनल टोंगळे तालुका महासचिव, सचिव सागर निकम ,पूजा मराठे, संजय कांडेलकर, अजहर कासार, तालुका कोषाध्यक्ष अजय वंजारी, तालुका समन्वयक संदीप सपकाळे, मनीष चांदेलकर, विक्रम जाधव, आरती शिरतुरे, अमोल घटे, प्रफुल्ल मेढे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोलू मुर्हे, हातीम शेख,रोहन शिरूतुरे,संघर्ष मेढे,मनोज सावकारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव सोनल टोंगळे यांनी केले व आभार तालुका समन्वयक मनीष चांदेलकर यांनी मानले.