धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात नवीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यभार घेतल्यापासून त्यांनी पहिल्याच दिवशी वाळूमाफियांना तंबी दिल्याने अनेक तालुक्यातील वाळूमाफियांना पकडण्यासाठी आदेश देण्यात आले होते. त्यावरच धरणगाव तालुक्यात वाळू चोरी सुरु असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेत २ वाहने पकडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मौजे चांदसर बु येथे अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर क्र MH32AH4776 योगेश पुरुषोत्तम कोळी व MH34L8254 योगेश ईश्वर कोळी यांचे मालकीचे असून सदर वाहन पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई श्री मनिषकुमार गायकवाड उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पाळधी मंडळ अधिकारी अमोल पाटील, लक्ष्मीकांत बाविस्कर मंडळ अधिकारी सोनवद तलाठी आरिफ शेख व तलाठी दत्तात्रय पाटील आणि समा तडवी पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.


