Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरकुल ग्रामीण गृह. अभियंता सोमवारपासून संपावर !
    जळगाव

    घरकुल ग्रामीण गृह. अभियंता सोमवारपासून संपावर !

    editor deskBy editor deskAugust 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महाराष्ट्रात प्रधानमंत्री, रमाई, शबरी यांसारख्या योजना मार्फत ग्रामीण भागातील लोकांना घरकुले दिली जातात. आता मोदी आवास योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सदरील लाभार्थीना पूर्ण सहकार्य करून त्यांच्या स्वप्नातील घरे पूर्ण करीत असतात. परंतु त्यांना किमान वेतन ही लागू नाही, त्यांना मिळणारे २०१६ पासून अत्यंत तटपुंजे प्रती घरकुल ७५०/- रुपये मानधन मिळत असून त्यातही जाचक अटींचा समावेश आहे. ते देखील वर्ष – वर्ष मिळत नाही त्यामुळे सदरील केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे बेरोजगार युवकांवर एकप्रकारे मुघली अन्याय – अत्याचार करीत आहे.
    ग्रामीण गृहनिर्माण अभियंतांना आजच्या महागाईच्या विळख्यात प्रपंच चालवणे कठीण जात असून काहींनी आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय विमा कवच, अपघाती विमा, प्रवास भत्ता काहीच मिळत नाही. पूर्ण झालेल्या घरकुलांचे श्रेय सदरील अभियंताना न देता सरकार श्रेय लाटण्याच काम करत असते. ज्यांच्या मुळे श्रेय घेता येत असेल निदान त्यांना किमान वेतन लागू करून नियमित मानधन तत्वावर भरती करावी, अशी आग्रही मागणी अभियंता यांची असून मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात होणाऱ्या त्रासाला सरकार जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

    Gharkul gruh abhiyanta Kendra sarkar rajay sarkar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.