जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक दिवसापासून रखडलेली भारतीय जनता पक्षाने आज तीन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली असून या तिन्ही जागेंवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची तर रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
भाजपने नुकतेच जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केली असून यात तिन्ही चेहरे नवीन आहे. जळगाव लोकसभेसाठी दिलेले ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते आपल्या कीर्तनातून राज्यभर प्रसिद्ध आहे तर दुसरे रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल महाजन हे दिवंगत माजी खा.हरीभाऊ जावळे यांचे चिरंजीव व गेल्या लोकसभेपासून मतदार संघात भाजपचे तरूण चेहरा व मोदी सरकारच्या योजना नागरीकापर्यत पोहचविण्याचे काम देखील ते करीत असतांना सातत्याने दिसत आहे. जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्वला बेंडाळे यांना अनेक वर्षापासून मनपातील जेष्ठ नगरसेविका म्हणून ते कार्य करीत असून महिलांना संधी म्हणून त्यांना हि संधी देण्यात आली आहे.