Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोघांवर एमपीडीएअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई
    क्राईम

    दोघांवर एमपीडीएअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई

    editor deskBy editor deskJuly 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील दोन जणांवर महसूल प्रशासनाने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश दिले. निखिल उर्फ पिया सुनिल कुडे (वय २४, रा. एम.जे. नगर, चाळीसगाव) व शेख चाँद शेख हमीद (३८, दीनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी दोघांची नावे आहेत.

    निखील उर्फ पिया सुनिल कुडे हा २०१८ पासून चाळीसगाव तालुक्यात विनापरवाना अवैधरित्या वाळूची चोरी करुन विक्री करीत होता. त्याच्यावर वाळू चोरीचे ५ गुन्हे दाखल होते. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी मान्यता दिली. एमपीडीए अंतर्गत त्यास एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

    शेख चाँद शेख हमीद हा २०१५ पासून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात साथीदारांसह खून करणे, जबरी चोरी करणे, अनैतिक देह व्यापार करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, फसवणूक करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा विविध प्रकारचे एकूण ११ गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मंजूरी दिल्याने त्यांच्या विरोधात एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.