Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिंदेंची रणनिती : एक ही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही !
    राजकारण

    शिंदेंची रणनिती : एक ही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही !

    editor deskBy editor deskJuly 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेत अजित पवार आल्याने आता सत्तेत तीन वाटे झाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असतांना शिंदेंनी त्यांची बैठक घेत मोठे बळ दिले आहे.

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 152 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यामुळे भाजपच्या शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांना किती जागा मिळणार? याविषयी साशंकता निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेतील बंडावेळी आपल्यासोबत आलेल्या 50 पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा दावा केला.

    सत्ताधारी पक्ष विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवणार आहेत. मी माझ्या पहिल्याच भाषणात हे 50 आमदार 200 आमदारांचा टप्पा ओलांडणार असल्याचे सांगितले होते. तसेच माझ्यासोबत असणाऱ्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा निर्धारही व्यक्त केला होता. त्याचा पुनरुच्चार मी आताही करतो. मी माझ्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही, असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारसोबत का घेतले? या प्रश्नाचेही उत्तर दिले. ते म्हणाले की, राजकारणात काही बेरजेची गणिते असतात. त्यासाठी नव्या मित्रांची गरज असते. पण यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री असून, माझ्यामागे 200 हून अधिक आमदारांचे पाठबळ आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.